
दक्षिणेकडची अभिनेत्री कीर्ती सुरेशने साडीतले तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कीर्तीने या फोटोंमध्ये रोझ गोल्ड रंगाची साडी नेसली आहे. जॉर्जेटच्या या साडीवर अतिशय सुंदर असे वर्क केले आहे. साडीचा काठ जरा गडद रंगाचा असून त्यावर अतिशय नाजूक एम्ब्रॉयडरी केलेली आहे. या साडीवर कीर्तीने एक रॉयल टच असलेला ब्लाउज घातलेला आहे. साडीसोबत तिने कानात गोल्डन इअरिंग्ज आणि बोटात अंगठी असे कमीतकमी दागिने घालून तिच्या लूकला सोबर बनवले आहे.































































