मुलीने कंडोम विकत घेतल्यास त्यात वाईट काय? अभिनेत्रीचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजही कोणी मुलगी कंडोम विकत घेतल्यास लोकांच्या भुवया उंचावतात, मुलीने कंडोम विकत घेतल्या काय वाईट आहे असा सवाल प्रनुतन बहल या अभिनेत्रीने विचारला आहे. प्रनुतनचा हेल्मेट या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपटात कंडोम विषयी असेल्या रुढींवर आधारित आहे. या निमित्ताने नवभारत टाईम्सला दिलेल्या एका मुलाखातीत प्रनुतनने हा प्रश्न विचारला आहे.

प्रनुतन म्हणाली की, आजही कुठली मुलगी मेडिकलमध्ये कंडोम विकत घ्यायला गेल्यास आजूबाजूच्या लोकांच्या भुवया उंचावतात. जर एखाद्या मुलीने कंडोम विकत घेण्यात काय चुकीचे आहे? हा काही गुन्हा नाही असे प्रनुनतने म्हटले आहे. तसेच आपल्या समाजात सेक्सबद्दल फार बोलले जात नाही म्हणून कंडोमबद्दल बोलताना लोक लाजतात. कंडोम विकत घेणे चुकीचे नसल्याचा संदेश आपल्या आगमी चित्रपट हेल्मेटमध्ये दिल्याचे प्रनुतनने सांगितले आहे. तसेच मी कधी कंडोम विकत घ्यायला गेले नाही परंतु आमच्या चित्रपटामुळे यात काही बदल होतील अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.

प्रनुनत बेहल ही सुप्रसिद्ध अभिनेता मोनीष बेहेल यांची मुलगी आहे. प्रनुनतने नोटबुक चित्रटपटातून बॉलिवूडध्ये पदार्पण केले होते.