आणखी एका अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचवर खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये सध्या कास्टिंग काऊचवरून वातावरण तापलेले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचबाबत रोज नवनवीन गौप्यस्फोट होत असताना आणखी एका अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेला कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे. बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिच्यासोबत झालेला कास्टिंग काऊचचा प्रसंग सर्वांसोबत शेअर केला आहे.

tanushree-dutta-1

‘एकदा मी एका चित्रपटासाठी दिग्दर्शकासोबत चर्चा करायला गेले होते. तिथे तो दिग्दर्शक मला सांगू लागला की, चित्रपट चांगला होण्यासाठी दिग्दर्शक व अभिनेत्रीमध्ये प्रेमाचं नातं असलं पाहिजे. त्यामुळे सेटवर वातावरणही चांगलं राहतं. अप्रत्यक्षरित्या तो माझ्या जवळ येण्यासाठी हे सर्व बोलत होता हे मला कळलं होतं. अभिनेत्री ग्लॅमरस असली की ती काहीही करू शकते, असा लोकांचा समज आहे. पण मी काही पब्लिक प्रॉपर्टी नाही.’ असं तनुश्री दत्ताने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

मिस इंडिया असलेल्या तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडमध्ये जवळपास १५ चित्रपट केल्यानंतर ती गायब झाली होती. काही दिवसांनी तनुश्रीला कॅन्सर झाल्याचे देखील समोर आले आहे. तनुश्रीचे २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्यावेळी अभिनेता नाना पाटेकरसोबत वाद झाले होते.