… म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे, ब्रेकअपनंतर मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय

अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री यशश्री मसूरकर हिने आयुष्यात कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्ष एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने अचानक ब्रेकअप केल्याने यशश्रीला त्याचा प्रचंड मनस्ताप झाला व तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tuktukrani (@yashashri.masurkar)


इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत य़शश्री मला म्हणाली, मी एका माणसाच्या प्रेमात वेडी झाले होत. मला आमचं नातं खूप घट्ट वाटत होतं, प्रत्येक मुली प्रमाणे मी देखील लग्नाची स्वप्न बघितली होती. तो आमच्याच इंडस्ट्रीमधलाच आहे पण अभिनेता नाही. त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात मी त्याला साथ दिली. पण त्याने मला फसवलं. माझं मन दुखावलं. मला लग्न करायचं नाही, तुझ्याशी नाही आणि कुणाशीही नाही’ असं म्हणत त्याने नातं संपवलं. जो पर्य़ंत त्याचा संघर्ष सुरू होता तोपर्यंत तो माझ्यासोबत होता. जेव्हा त्याने वेगळं व्हायचा निर्णय घेतला तेव्हा मला धक्का बसला. पण आता मी हळू हळू त्यातून बाहेर पडत आहे. पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे यशश्रीने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tuktukrani (@yashashri.masurkar)

सध्या यशश्रीच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे मात्र अद्याप ही फक्त सुरुवात असल्याचे सांगितले आहे. ”मी सध्या एका व्यक्तीशी बोलत आहे. मात्र त्याबाबत बोलावं असं काही ठोस नाही. आताशी सुरुवात आहे’, असे यशश्री सांगते.