‘कोपर्डी’चे कामकाज अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील पाहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारासह खून प्रकरणातील तीन आरोपींना फाशीच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहण्यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अ‍ॅड. यादव पाटील हे सध्या जिल्ह्यातील बहुचर्चित पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचे काम सत्र न्यायालयात पहात आहेत. कोपर्डी येथील बलात्कारासह खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यावर संभाजीनगर खंडपीठात सूनावणी होणार आहे. खटल्याचे स्वरुप गंभीर असल्याने उच्च न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने सरकारी पक्षाचे कामकाज पाहण्यासाठी राज्यातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी त्यांच्या नियुक्तीची मागणी केली होती.