
उपनगरातील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वीज आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणनंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटीनेही आपल्या घरगुती ग्राहकांना जून महिन्याचे वीज बिल तीन समान हप्त्यात भरण्याची सकलत दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच ग्राहकांच्या वीज कापराचे मीटर रिडींग सुरू झाले आहे. त्यामुळे जून महिन्यात घरगुती ग्राहकांना वाढीव वीज बिले आली आहेत. त्याचा एकाचवेळी ग्रहकांवर भुर्दंड नको म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटीने तीन हप्त्यामध्ये बिल भरण्याची सकलत दिली आहे. तसेच विजबिलाबाबत ग्राहकांना असलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी उपनगरातील आठ ग्राहक सेवा केंद्रावर 25 हुन अधिक हेल्प डेस्क उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी 19122 आणि 9594519122 या दोन हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.































































