धारावीचा पुनर्विकास अदानी करणार, 5 हजार कोटींची निविदा मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) आज बांधकाम निविदा छाननी पूर्ण करून उघडल्या आहेत. त्यामध्ये अदानी समूहाने बाजी मारली आहे. त्यांनी पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे.

अदानी समूहाने सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली लावली असून डीएलएफ समूहाने 2025 कोटी रुपयांची बोली लावली आहे, तर नमन समूहाची निविदा अपात्र ठरली आहे. प्रकल्पासाठी एक हजार 600 कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लावण्याची अट होती. आता राज्य सरकारच्या मंजुरीनुसार निविदा अंतिम करून पुनर्विकास प्रकल्पास सुरुवात होऊ शकणार आहे.