रत्नागिरीत दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 10 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली.

यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी 24 प्रस्ताव आले होते. दिनांक 7 ऑगस्ट रोजी 24 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून आदर्श शिक्षक निवडण्यात आले.जिल्ह्यातील 10 शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये मंडणगड – किशोर देवकर नूतन विद्यामंदिर पालघर, दापोली-गणेश तांबिटकर, प्राथमिक मराठी शाळा विसापूर दापोली, खेड-सुनील तांबे, आदर्श शाळा घाणेखुंट क्र.2, चिपळूण- वृषाली सुर्वे, पूर्ण प्राथमिक शाळा कात्रोळी देऊळ,गुहागर- प्रभाकर कांबळे मढाळ शाळा क्र.३, संगमेश्वर-सुधीर सावंत जि.प.शाळा बोंड्ये, रत्नागिरी-संजीवनी भावे पूर्ण प्राथमिक शाळा कोतवडे धामेळे, लांजा-जनार्दन मोहिते, बेनी बुद्रुक क्र.1, राजापूर-मदन डोर्लकर-केंद्रशाळा वाडीखुर्द आणि विशेष पुरस्कार विलास कानर,पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मोर्डे क्र.1 यांना जाहीर करण्यात आला.

सध्या कोरोनाचे संकट असल्याने पुरस्कार वितरण सोहळा होणार नाही. कोरोनाचे संकट गेल्यावर पुरस्कार सोहळा होईल असे शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी सांगितले. पुरस्काराची निवड करताना शिक्षकांचे योगदान, त्यांच्या कामाची पहाणी करून आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी मुरकुटे उपस्थित होते.