आदित्य ठाकरे, फडणवीस राज्यासाठी चांगले काम करतील! अनिल कपूर यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आज आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नायक आहेत. ते महाराष्ट्रासाठी चांगले काम करतील, असा विश्वास  अभिनेते अनिल कपूर यांनी व्यक्त केला.

शहरातील एका शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही नायक चित्रपटात एक दिवस मुख्यमंत्री बनला होतात. त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीत खरा नायक कोण’, असा प्रश्न किचारल्यानंतर अनिल कपूर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध होते. यासह देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. हे दोघेही महाराष्ट्रासाठी चांगले काहीतरी करतील. युवा नेते निवडून आल्यास हे देशासाठी चांगले राहील.