
संभाजीनगरहून जालना शहराकडे जाताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे स्वागतासाठी थांबली होती. तेव्हा जवळच दुचाकी घसरुन एक कुटूंब खाली पडले. तेव्हा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तातडीने त्यांच्याजवळ जात त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यासोबत असलेल्या चिमुकलीला चॉकलेट दिले.
युवासेनीप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा शनिवारी दुपारी संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात दाखल झाली. तेव्हा बदनापूर तालुक्यातील वरुडी पाटीजवळ स्वागतासाठी जनआशिर्वाद यात्रेला थांबविण्यात आले होते. त्यावेळी काही अंतरावर पती-पत्नी व त्यांची मुलगी दुचाकीने जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. ही घटना बघताच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे जात त्यांची विचारपूस करत माणुसकीचे दर्शन घडविले. शिवाय तेथे असलेल्या चिमुकलीला चॉकलेट देत तिच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार संतोष सांबरे उपस्थित होते.






























































