मी भिजलो तरी चालेल, पण शिवप्रतिमा भिजू देऊ नका – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे जन आशिर्वाद यात्रा पार पडली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. यावेळी भर पावसात शिवप्रतिमेवर छत्री धरा, माझ्यावर नको. शिवप्रतिमा भिजली नाही पाहिजे, मी भिजलो तरी चालेल, असे भावनिक उद्गार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले.

गंगाखेड येथील जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे यांचा पोखर्णी नृसिंह येथील फाट्यावर जनसंवाद कार्यक्रम पार पडला. भर पावसात परिसरातील जनता उपस्थित होती. भर पावसातील या जनतेला पाहून आदित्य ठाकरे म्हणाले, जनतेचे हेच प्रेम, हेच आशीर्वाद कायम पाहिजेत. मला यांच्यातच खरा महाराष्ट्र घडवायचा आहे. मी पावसात भिजलो तरी चालेल. परंतु माझ्या मराठवाड्याला पाऊस पाहिजे. या मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे पावसाची नितांत गरज आहे. मी भिजलो तरी चालेल. पाऊस पडू द्या, असेही भावोद्गार त्यांनी काढले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोखर्णी नृसिह परिसरातील नंदकुमार गिराम, रेखा सुर्वे, लताबाई कच्छवे, पद्माकर बेले आदी आत्महत्याग्रस्त शेतकNयांच्या कुटुंबीयांना शेती उपयोगी फवारे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे परभणी ग्रामीण तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले पाटील, रवी पतंगे, सर्वâलप्रमुख आत्माराम वाघ, युवा तालुका उपाध्यक्ष पप्पू वाघ, आनंतराव कच्छवे, राजू पांचाळ, रामकिशन येलकेवाड, माणिक आव्हाड, नारायण वाघ, गजानन बेले, तुकाराम बेले आदींसह पदाधिकाNयांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास स्थानिक पातळीवरील वसंतराव देशमुख, जनार्दन सोनवणे, सचिन राष्ट्रकुट, सुभाष देशमुख, प्रल्हाद लाड, सतीश घाडगे, बालासाहेब लबडे, किशन मोगल, कृष्णा गोरे, परमेश्वर सुव्रेâ, बंडू वाघ, कृष्णा विखे, विनायक वाघ, कृष्णा वैरागर, संजय बेले, बालासाहेब अंगलगावकर, सोपान बायस आदींची उपस्थिती होती.