विक्रमी नमन – 18 डिसेंबरला ‘अदृश्य रंगकर्मी’चे गिरगावात सलग तीन प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमन या लोककला प्रकारात अभिनव प्रयोग करणारे कवी, गायक, निर्माते अशोक दुदम पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. येत्या 18 डिसेंबर रोजी गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात ‘अदृश्य रंगकर्मी’ नमनाचे सलग तीन प्रयोग सादर होणार आहेत. यानिमित्ताने दोन हजारांहून अधिक प्रेक्षक नमनाचा आनंद घेणार आहेत.

दिव्या हर्ष इंटरप्राईजेसच्या ‘अदृश्य रंगकर्मी’ नमनामध्ये संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावातील चाळीस कलाकार एकत्र येणार आहेत. श्रवणीय गीतरचना, मोहून टाकणारी नृत्यं, विनोदी, खटय़ाळ नाटय़प्रवेश परंपरेत खंड पडू न देता सादर होणार आहे. पुरुष कलाकारच स्त्र्ााrचा साजशृंगार करून गणगौळण नंतर ‘अदृश्य रंगकर्मी’ ही नाटय़कृती सादर करणार आहेत. सूर्या गोवळे मुख्य व्यक्तिरेखेत आहेत. नितीन पवार प्रथमच मावशीच्या धमाल भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सकाळी 11, दुपारी 3.30 आणि रात्री 7.30 वाजता असे सलग तीन प्रयोग होणार आहेत. लेखन, दिग्दर्शक रूपेश दुदम यांचे आहे.