गुडघा आणि खुबा बदल शस्त्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुडघा आणि खुबा बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक स्ट्रायकर माको रोबोटीक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयाने हे तंत्रज्ञान रुग्णसेवेत दाखल करून घेतले आहे. गुडघा आणि खुबा बदल शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ही सुरक्षित आणि अचूक पद्धती मानली जाते. हाडाचा निकामी झालेला भाग काढून टाकताना उर्वरीत हाडाला आणि उतींना इजा होणार नाही अशा रितीने शस्त्रक्रिया करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होतं.  या तंत्रज्ञानाचा वापर करत केलेल्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला तुलनेने कमी वेदना होतात, त्याची प्रकृती झपाट्याने सुधारते, रुग्णालयातील त्याच्या वास्तव्याचा कालावधीही कमी होतो, रक्तपातही फार होत नाही आणि शस्त्रक्रियेसाठी दिली जाणारी चीरही फार मोठी नसते असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे. नवे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्णांना त्रासातून लवकर बरे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो, या तंत्रज्ञानाचा अवलंब हा त्याचाच एक भाग आहे असे  वोक्हार्ट रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका झहाबिया खोराकीवाला यांनी सांगितले.