
अॅडव्हर्बने मेड इन इंडियांतर्गत एक अत्याधुनिक डॉग रोबोट बनवला आहे. या रोबोटचे नाव असिस्टिव्ह डॉग रोबोट-ट्रॅकर 2.0 असे असून या डॉग रोबोटला मुंबईत पार पडलेल्या लॉजीमॅट इंडिया 2025 मध्ये प्रदर्शनासाठी आणले होते. ट्रॅकर 2.0 एक अत्याधुनिक क्वाडपेड रोबोट असून हा बहुआयामी रोबोटमध्ये 20 किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. यात 90 मिनिटांची बॅटरी क्षमता, स्टिरिओ पॅमेरा, जेस्चरवर आधारित कमांड्सची क्षमता आहे.
            
		





































    
    




















