वापर करा अथवा करू नका, फेसबुकची तुमच्यावर नजर असतेच; कशी ते वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील कोट्यवधी युझर्स फेसबुक या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करतात. फेसबुकद्वारे व्हिडीओ, फोटोसह आपल्या भावना युझर्स व्यक्त करत असतात. परंतु अनेकदा फेसबुकद्वारे युझर्सवर नजर ठेवली जात असल्याचेही समोर आले आहे. तुम्ही फोनवर फेसबुक वापरा अथवा नका वापरू, पण ते तुमच्यावर नजर ठेऊन असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

अनेकदा आपण एखाद्या अॅपद्वारे शॉपिंग करतो आणि एखाद्या वस्तूची ऑर्डर करतो. तुमच्या या शॉपिंगवरही फेसबुकची नजर असते. कारण एखाद्या वेबसाईटद्वारे तुम्ही एखाद्या वस्तूचा शोध घेतला असता काही वेळातच ती वस्तू किंवा तशा प्रकारच्या वस्तूची जाहिरात तुमच्या फेसबुकवर दिसू लागते. याला ‘टार्गेटेड जाहिरात’ असे म्हटले जाते आणि याचा फेसबुक वापर करतो. आता फेसबुक आपली ही माहिती कशा पद्धतीने मिळवतो हे पाहूया…

Off Facebook Activity चा वापर
तुम्ही फेसबुकचा वापरत करत नसलात तरीही तुमचा ऑफलाईन डाटा फेसबुकपर्यंत पोहोचतो. फेसबुककडे एक ऑफ फेसबुक अॅक्टिव्हिटी (Off-Facebook Activity) नावाचा पर्याय आहे. Off Facebook Activity द्वारे दुसऱ्या कंपनी फेसबुकसोबत युझर्सची माहिती शेअर करतात. यात तुम्ही त्या वेबसाईटवर शोधलेल्या वस्तू आणि ऑर्डरचाही समावेश असतोत. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या वेबसाईटद्वारे शॉपिंग केली किंवा फेसबुक लॉग इनद्वारे वेबसाईटचा अॅक्सेस मिळवला तर याची माहिती फेसबुककडे जाते.

दुसऱ्या कंपन्या अशा पद्धतीने फेसबुकसोबत माहिती करतात शेअर
तुम्ही एखाद्या ऑनलाईन स्टोअरद्वारे कपडे खरेदी केले तर ती कंपनी तुमची ही अॅक्टिव्हिटी फेसबुकच्या बिझनेस टूलद्वारे फेसबुकशी शेअर करतात. ही माहिती फेसबुक आपल्या अकाउंटवर सेव्ह करते. तुम्ही कोणते अॅप ओपन केले, कोणता कंटेंट पाहिला, कोणती वस्तू शोधली, कोणती वस्तू खरेदी केली ही सर्व माहिती फेसबुकसोबत शेअऱ केली जाते. या सर्व माहितीचा वापर टार्गेटेड जाहिरातीसाठी केला जातो, असे फेसबुकचे म्हणणे आहे.

facebook

तुमच्या सोबतही असे घडले असेल…
विविध वेबसाईट आणि अॅपद्वारे मिळणाऱ्या या माहितीचा वापर करून कंपनी युझर्सवर फेसबुकद्वारे जाहिरातींचा भडिमार करते. अनेकदा तुम्हीही पाहिली असेल की एखाद्या वेबसाईटवर तुम्ही एखादी वस्तू शोधली की त्याची जाहिरात तुमच्या फेसबुक पेजवर येते. यालाच टार्गेटेड जाहिरात म्हणतात.