अफगाणिस्तानात मशिदीतील बॉम्बस्फोटांत 62 ठार, 60 जखमी

623

अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील मशिदीमध्ये शुक्रवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत 62 ठार, तर 60 जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास नमाज अदा करत असतानाच हे स्फोट घडवून आणले गेले. स्फोटांमागे कोणाचा हात आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांनी या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेत मोठय़ा प्रमाणावर वाढ केली आहे.

हल्लेखोरांनी हस्का मिना जिह्यातील जॉ डेरा भागातील मशिदीला लक्ष्य केले. बॉम्बस्फोटात मशिदीचे संपूर्ण छत खाली कोसळले. छताच्या ढिगाऱयाखालीही काही नागरिक सापडले असून त्यांच्या बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच गझनी शहर बॉम्बस्फोटांनी हादरून गेले होते. गझनी विद्यापीठात झालेल्या या स्फोटांमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या