
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील दुसऱया टप्प्यात हिंदुस्थानी संघाला अफगाणिस्तानशी झगडावे लागणार आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया हिंदुस्थानी संघाला 2026च्या फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री होणाऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे.
‘ब’ गटात असलेल्या हिंदुस्थानी संघाला आतापर्यंतच्या दोन सामन्यांत एक विजय व एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हिंदुस्थानी संघ सध्या गटात 3 गुणांसह तिसऱया स्थानी आहे, मात्र एका गटातून आघाडीचे दोनच संघ आगेकूच करणार आहेत. त्यामुळे कुवैत आणि कतार यांच्याविरुद्धची लढतही हिंदुस्थानसाठी निर्णायक ठरेल. जूनमध्ये हिंदुस्थानी संघ या दोन्ही संघांविरुद्ध परतीच्या लढती खेळणार आहे. प्रशिक्षक इगॉर स्टिमाक यांनीसुद्धा अफगाणिस्तानविरुद्धची लढत जिंकून पुढील आव्हानांवर लक्ष पेंद्रित करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे सांगितले.
हिंदुस्थानने पहिल्या सामन्यात कुवैतला 1-0 असे नमवले होते. त्यानंतर कतारकडून 0- 3 असा पराभव पत्करला. आता अफगाणिस्तानशी हिंदुस्थानी संघ पहिल्या टप्प्यातील लढत खेळणार आहे. मग 26 मार्चला आसाम येथे अफगाणिस्तानविरुद्धचा दुसऱया टप्प्याचा सामना खेळविला जाईल.


























































