तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानची स्थिती भीषण, अन्न विकत घेण्यासाठी नागरिक विकताहेत मुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑगस्ट 2021मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य परत घेण्याचा निर्णय घेतला आणि तालिबान्यांनी पुन्हा त्याचा कब्जा घेतला. त्यानंतर आता अफगाणी नागरिकांची स्थिती अत्यंत भीषण असल्याची वृत्त प्रसारित होत आहेत.

सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. या देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळली असून अफगाण नागरिकांची अन्नान्न दशा झाली आहे.

अनेक कुटुंबे गुजराण करण्यासाठी नाईलाजाने विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. स्वतःची काही ठेव विकल्यानंतर आता ते कुटुंबातील मुलींची विक्री करत आहेत.

अफगाणिस्तानमधील अनेक कुटुंब सध्या त्यांच्या लहान मुलींची लग्न लावून त्यांना विकत आहेत. त्या बदल्यात त्यांना पैसे, जमीन, शेळ्या अशा गोष्टी मिळत आहेत. कित्येक कुटुंबांमधून एकाहून अधिक मुली विकल्या गेल्या आहेत.

कित्येक नागरिक अशा कुटुंबांना हेरून त्यांना कर्ज देऊन त्यांच्यासोबत मुलींचे सौदे करत असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या मुलींच्या शाळा बंद असल्याने त्यांची लग्ने लावून देण्यात येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यापैकी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार देखील होत आहेत.