मुलाला शाळेतील पोरंटोरं चिडवायला लागली, सानिया मिर्झा मुलाला घेऊन हिंदुस्थानात परतली

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा- सानिया मिर्झा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू असून तिने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न केलं आहे

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि हिंदुस्थानची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. मलिक याचे हे तिसरे लग्न आहे.

शोएब आणि सानियाचे संबंध बऱ्याच दिवसांपासून ताणले गेलेले होते आणि ते विभक्त झाल्याच्यासतत बातम्या येत होत्या. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाला एक मुलगा असून, ज्याचे नाव इझान आहे. इझानचा जन्म 2018 मध्ये झाला होता. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने इझान खूप अस्वस्थ आहे.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा वेगळे झाल्यापासून इझान मानसिकरित्या खचला असून पाकिस्तानी वाहिनी डेली पाकिस्तानने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की शोएब आणि सानिया वेगळे झाल्यापासून इझान 3 दिवस शाळेतच गेला नाही. शोएबची तीन लग्ने झाली असून त्याच्या शाळेतील मुले त्याला वडिलांच्या तीन लग्नांवरून सतत चिडवत होती. यामुळे इझान हा तणावाखाली आला होता.

मुलाची मानसिक स्थिती पाहून सानिया त्याला घेऊन दुबईहून हिंदुस्थानात परतली आहे. ज्या दिवशी शोएब मलिक, सना जावेदसोबत निकाह पढत होता तेव्हा सानिया इझानला कुराण कसे वाचावे हे शिकवत होती. शोएबशी मतभेद असले तरी सानिया मिर्झाला शोएब मलिकच्या कुटुंबाकडून कधीही वाईट वागणूक मिळाली नाही. ते सानियाच्या पाठीशी सातत्याने उभे होते असे वृत्त या पाकिस्ताना वाहिनीने दिले आहे.

डेली पाकिस्तानच्या वृत्तानुसार, शोएब मलिकने सना जावेदसोबतच्या लग्नात कोणालाही आमंत्रित केले नव्हते. या लग्नाला मलिकची आई आणि त्याच्या बहिणीही उपस्थित नव्हत्या. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे लग्न 2010 मध्ये झाले होते.