हिंदुस्थानचा वॉटर स्ट्राईक पाकड्यांच्या जिव्हारी; पाण्यासाठी तरसणार पाकिस्तान

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत पाकिस्तानला जेरीस आणले आहे. आता हिंदुस्थानने सिंधू, चिनाब, झेलम नदीचे पाणी रोखून पाकड्यांच्या तोंडाला फेस आणणार आहे. हिंदुस्थानचा हा वॉटर स्ट्राईक पाकच्या जिव्हारी लागला आहे. हिंदुस्थानने चिनाबचे पाणी रोखल्याने आता पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार आहे. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात होत आहे.

हिंदुस्थानच्या वॉटर स्ट्राइकने पाकिस्तानच्या घशाला कोरड पडली आहे. चिनाबचे पाणी रोखल्यानंतर सिंधु नदी प्रणाली प्राधिकरणाने (IRSA) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 10 जूनपर्यंतच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या दिवसात पाकिस्तानला 21 टक्के पाण्याची कमतरता जाणवू शकते, असं आयआरएसएने म्हटलं आहे. सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवरच पाकिस्तानचे कृषी क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या कारवाईमुळे पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार असल्याचे दिसून येते.

हिंदुस्थानची कारवाईने पाकड्यांची चिंता वाढत आहे. 11 जून ते सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या खरीप हंगामात फक्त 7 टक्के पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. चिनाब नदीचा प्रवाह लवकर सामान्य झाला नाही, तर पाकिस्तानमधील जलसंकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. सिंधू जल करार स्थगित करुन हिंदुस्थानने घेतल्या कठेर निर्णयाचा परिणाम आता दिसत आहे. तसेच पाकिस्तानच्या घशाला कोरड पडण्यास सुरुवात झाली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानातून पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याची अमलबजावणी सुद्धा सुरु केलीय. तसेच चिनाब नदीच पाणी रोखण्यात आले आहे. आता सिंधूची उपनदी असलेल्या झेलमच पाणी रोखण्याची तयारी करण्यात येत आहे. चिनाब नदीचे पाणी रोखण्यासाठी बगलिहार धरणाचे दरवाजे बंद केले आहेत. चिनाबचा प्रवाह 90 टक्क्याने कमी झाला आहे. म्हणजे पाकिस्तानात जाणारी चिनाब नदी कोरडी पडायला सुरुवात झाल आहे. पुढच्या काही दिवसात झेलमचे पाणी किशनगंगा धरणावर रोखण्याची योजना आहे. हिंदुस्थानने झेलमचे पाणी रोखल्यास पाकिस्तानवर पाण्याच्या प्रत्येक थेंबा-थेंबाला तरसण्याची वेळ येणार आहे.