
शुक्रवारी साऊथचा हिरो पुनीत राजकुमारचा हृदविकाराच्या झटक्याने 46 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या चाहत्यांना याचा धक्का बसला असून दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुनीतच्या मृत्यूमुळे एका फॅनला इतके दुःख झाले की त्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यात मुनियप्पा हा पुनीतचा मोठा फॅन होता. पुनीतचे निधन झाल्याची बातमी त्याने टीव्ही पाहिली आणि त्याला हृदयविकारचा झटका आला. 30 वर्षीय मुनियप्पाचा जागीच मृत्यू झाला. मुनियप्पा हा शेतकरी होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.
तर दुसरीकडे बेळगाव जिल्ह्यातील शिंदोली गावाचा रहिवासी परशुराम देमन्नावार हा पुनीतचा मोठा फॅन होता. त्याला पुनीतच्या निधनाची वार्ता कळाल्यानंतर खूप दुखी झाला. टीव्हीवर ही बातमी पाहून तो सारखा रडात होता. अखेर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
बेळगावमध्येच अथानी भागात राहणारा राहुल गादिवादारा नावाचा तरुण हा ही पुनीतचा मोठा चाहता होता. पुनीतच्या निधनाची माहिती कळाल्यानंतर तो खुप दुखी झाला. राहुलने पुनीतच्या फोटोला हार लावला आणि फुलं लावली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.


























































