विद्या बालन साकारणार गणिततज्ज्ञाची भूमिका; शंकुतला देवी यांच्या चरित्रपटात दिसणार

492
विद्याचा बॉलिवूड प्रवास अतिशय संघर्षमय राहिला आहे. सुरुवातीच्या काळात तिला जवळपास १२ चित्रपटातून काढण्यात आले होते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’मध्ये वैज्ञानिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन आगामी चित्रपटात शकुंतला देवी या गणितीतज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विद्या सज्ज आहे. हा चित्रपटचे दिग्दर्शन अनु मेनन करणार आहेत.

एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालन म्हणाली की, ती या चित्रपटात एका मानवी संगणकाची भूमिका साकारणार असून या भुमिकेला तिची स्वत:ची ओळख देण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. या भूमिकेसाठी तिने कुरळ्या केसांमधील बॉब कट केला आहे. आपला  चेहरा दक्षिणात्य अभिनेत्रीप्रमाणे असल्याने आपण या भुमिकेला नक्कीच न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

विद्या बालन महिलांवर आधारीत चित्रपटांसाठी प्रसिध्द आहे. करियरच्या सुरुवातीपासुनच तिने महिलांवर आधारीत असलेले दर्जेदार सिनेमे केले आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतही रसिकांना उत्सुकता आहे. ‘मिशन मंगल’ या चित्रपटालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या