
आपण बऱ्याच व्यक्ती पाहतो, ज्यांना दुपारी जेवण झाले का डुलक्या येण्यास सुरुवात होते. मात्र, दुपारचे झोपणे योग्य आहे का? अनेक जण म्हणतात दुपारचे थोडे तरी झोपावे. ते आरोग्यासाठी चांगले असते. पण, हे खरे आहे का? तसेच दुपारी कोणी झोपणे आवश्यक आहे आणि का? त्याचप्रमाणे दुपारचे झोपण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत.
दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. पण, दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली नसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय लठ्ठपणा आणि मधुमेहाचाही धोका वाढतो. त्यामुळे दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. अशा वेळी दिवसा झोपल्याने कफ आणि पित्त यांचे संतुलन बिघडते. यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मात्र, आयुर्वेदात काही लोकांना दिवसा झोपण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. विशेषतः विद्यार्थी, वृद्ध, मजूर आणि ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे, असे लोक दिवसभरात झोपू शकतात. परंतु, जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
या व्यक्ती दिवसा झोपू शकतात
विद्यार्थी
विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करून कंटाळा येतो. दुपारी एक छोटीशी डुलकी त्यांच्या मेंदूला विश्रांती देण्यास मदत करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी झोपणे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे.
ज्येष्ठ नागरिक
दिवसभरात शरीराला विश्रांती देण्यासाठी काही वेळ झोपता येते. यामुळे त्यांना गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तसेच वयामानुसार त्यांची झोप देखील कमी होते. त्यामुळे त्यांची रात्री झोप पूर्ण देखील होत नाही. त्यामुळे अशा व्यक्ती झोपू शकतात.
दुःखी लोक
दुपारची झोप अशा लोकांना वेदना विसरण्यास मदत करू शकते. ज्यांना जास्त राग येतो. त्यांना मन शांत ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अशा व्यक्ती दुपारच्या झोपू शकतात.
श्रमजीवी
जे लोक शारीरिक अंग मेहनतीचे जड काम करतात ते प्रचंड थकतात. अशा व्यक्ती दुपारी झोपू शकतात. त्यामुळे त्यांचा थकवा कमी होईल आणि शरीर पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते.



























































