मुरुड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन

476

मुरुड ग्रामपंचायतीने 21 लाखांचा निधी दिला नसल्याच्या कारणावरुन प्रहार संघटनेच्यावतीने ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याआधी प्रहार संघटनेच्या वतीने मुरुड ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीचे पत्र दिले होते. वित्त आयोगातील 14 लाख रुपये व स्वनिधीतील 21 लाख रुपये वितरित करण्याचे आश्वासन देऊनही ग्रामपंचायतीने केवळ 14 लाख रुपयाचेच वितरण केले व 21 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या अपंग कल्याण निधीत वर्ग करण्याचे आदेश असतानाही ते वर्ग केले नाहीत. दिव्यांग निधीचे वितरणही केले नाही. त्यामुळे संघटनेतर्फे पुन्हा ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या