कळमनुरीत शिवसेनेने काढली राम कदमांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कळमनुरी

‘मुलगी पसंत आहे, पळवून आणायला मी मदत करीन’ अशी ’रावण’वाणी करून महाराष्ट्रातील महीला व माता-भगिनींचा अपमान करणारे भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी शहरातुन प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. शिवसेना महीला आघाडीने राम कदम यांच्या प्रतिमेला चप्पल व जोड्यांनी बडवत निषेध व्यक्त केला.

भाजपचे प्रवक्ते तथा आमदार राम कदम यांनी महिलांविषयी अवमानजनक विधान केल्याचे तीव्र पडसाद गुरूवारी हिंगोली जिल्ह्यात उमटले. कळमनुरी शहरामध्ये शिवसेनेने भाजपच्या राम कदमांविरुध्द जोरदार नारेबाजी करत नवीन बसस्थानकापासुन प्रेतयात्रा काढली. कळमनुरी शहरातुन जाणाऱ्या मुख्य महामार्गावरुन शहराच्या विविध भागात फिरून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत ही प्रेतयात्रा नेण्यात आली.

युवासेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी मयुर शिंदे यांनी हातात मडके धरले होते. तर जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी तिरडीला खांदा दिला. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर राम कदमांच्या प्रतिमेला महिलांनी चप्पल व जोड्यांनी मारुन निषेध नोंदविला. यावेळी शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, उपजिल्हाप्रमुख डी.के. दुर्गे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शहरप्रमुख संतोष सारडा, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, नगराध्यक्ष उत्तम शिंदे, फकीरा मुंढे, वैष्णवी घुगे, अ‍ॅड. रवी शिंदे, नगरसेवक आप्पाराव शिंदे, बाळु पारवे, सुहास पाटील, दादाराव डुरे, अरविंद पाटील, नारायण साळवे, शिवा शिंदे, शिवराज पाटील, आर.आर. पाटील, बबलु पत्की, बाबुराव सुकळकर, धोंडबा निरगुडे, धोंडीबा पतंगे, रामराव मस्के, बाळासाहेब पतंगे, नामदेव कऱ्हाळे, पिंटु गडदे, कांता पाटील, शिवम नाईक, अतुल बुर्से, शिवा गायकवाड, सतीश तांबारे, वैजनाथ बोक्से, पप्पु वीर, नारायण काशी, अतुल वाघमारे, गणेश टाक, दिलीप दळवी, सुनील शिंदे, प्रकाश घुगे, दिनकर बांगर यांच्यासह शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.