![babu movie](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/babu-movie-696x447.jpg)
आगरी-कोळी भाषेचा झणझणीतपणा पहिल्यांदाच ‘बाबू’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. या वेळी कलाकारांनी आगरी बॅन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एन्ट्री केली, तर ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱया अंकित मोहनने अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली.चित्रपटाच्या 20 फूट पोस्टरचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
श्री समर्थ कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून 2 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होईल.