राज्याच्या कृषी पर्यटन धोरणास मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवेळी पाऊस, दुष्काळ आणि बिघडलेल्या निसर्गचक्रामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱयांचे पूरक व्यवसायातून उत्पन्न वाढवण्याबरोबरच पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात प्रदुषणमुक्त वातावरणात वास्तव्य करण्याचा अनुभव देण्यासाठी राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

वैयक्तिक शेतकरी, शेतकऱयांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱयांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या या कृषी पर्यटन केंद्र उभारु शकतात. या पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, त्यांना बँक कर्जही मिळेल. वस्तु व सेवा कर तसेच विद्युत शुल्क इत्यादीचा फायदा येईल.

उल्हासनगर पालिकेला डंपिंग ग्राऊंड
उल्हासनगर महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी ठाणे जिह्यातील उसाटणे येथील 11.5 हेव्टर शासकीय जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या जमीनीसाठी मूल्य आकारण्यात येणार नाही ही जमीन महलूस मुक्त असेल.

राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळून ती निवड मंडळांमार्फत भरण्याचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली.

कृषी पर्यटनासाठी अटी
दोन ते पाच एकर पर्यंत शेती आणि पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या आवश्यक आहेत. जेवणाची व्यवस्था व स्वयंपाक घरही आकश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रासाठी पहिल्यांचा नोंदणी करताना 2 हजार 500 रुपये शुल्क आणि दर पाच वर्षांना एक हजार रुपये नुतनीकरण शुल्क भरावे लागेल. पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक उप संचालक कार्यालयात किंवा www.maharashtratourism.gov. in या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध आहे.