गरब्याच्या नावाखाली ‘रासलीला’ करणाऱ्या पत्नीला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

सध्या देशभरात नवरात्रौत्वासाची धूम सुरू आहे. गरबा-दांडीया खेळत तरुण तरुणी रात्र जागवत आहेत. पण याचाच गैरफायदा घेत प्रियकराबरोबर ‘रासलीला’ करणाऱ्या पत्नीला (40) पतीने रंगेहात पकडले. ही घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

अहमदाबाद येथील सोला सायन्स रोडवरील हेतार्थ पार्टी प्लॉट येथे ही महिला पती व चौदा वर्षाच्या मुलीबरोबर राहते. रविवारी ती मुलीबरोबर गरबा खेळण्यासाठी गेली. गरबा संपल्यानंतर मुलगी रात्री 12 वाजता घरी आली. पण महिला मात्र आली नाही. तिचा मोबाईलही स्विच ऑफ होता. यामुळे घरी असलेल्या तिच्या पतीला काळजी वाटू लागली. पत्नीच्या काळजीने तो अस्वस्थ झाला होता. यामुळे तिची वाट पाहात तो घराबाहेरच बसून होता. रात्री 2 च्या सुमारास अचानक एक गाडी त्याच्यासमोर येऊन उभी राहfली. त्यातून त्याची पत्नी व एक तरुण बाहेर आले. पतीला बघताच महिलेची घाबरगुंडी उडाली. पत्नीला तरुणाबरोबर बघताच पतीचा संतापाचा भडका उडाला. त्याने धावत जाऊन त्या तरुणाची कॉलर पकडली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीत तरुणाची बॅग पतीच्या हातात आली.

त्यानंतर तरुण गाडीत बसून पळून गेला. पतीने बॅग तपासली असता त्यात तरुणाचं ओळखपत्रं सापडलं. युवराज बोराणा असे तरुणाचे नाव होते. तसेच बॅगमध्ये चार जिवंत काडतूसही सापडली. त्यानंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणाविरोधात तक्रार नोंदवली. तरुणाने तो बांधकाम व्यवसाय करत असल्याने स्वरक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा व काडतुसे बाळगल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी कारवाईकरत त्याला अटक केली आहे.