अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्याची दयनीय अवस्था, परतीच्या पावसाने खरीप पिकांना फुटले कोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदरपूर तालुक्यात गेली चार पाच वर्ष दुष्काळात गेल्यानंतर या वर्षी दुबार पेरणीचे संकट आले होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा सरीमुळे जोमात आलेले खरीप पिके परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. त्यामुळे पुढील सात महिने शेतकऱ्यांनी भागवावे कसे हा प्रश्न गंभीर बनला आहे.

तालुक्यात गेली दहा बारा दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतातील खरीप काढणी साठी आलेल्या सोयाबीन, ज्वारी, कापूस, भूईमुग, हाता तोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधातरीच जाणार असून तर दुसरीकडे आलेले कापूस, ज्वारी, सोयाबीन ही पिके परतीच्या अतिपावसामुळे खराब झाली आहेत. ज्वारी, सोयाबीनला मोड फुटले आहेत. संततधार पावसाने कोरडा दुष्काळ धुवून निघाला, परंतु सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने शेत आणि शेती जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ कुठलाही असो शेतकऱ्यालाच मारतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रशासनाचे शेतकऱ्याकडे साफ दुर्लक्ष झाले असून शेतकऱ्यामध्ये नाराजी दिसत आहे प्रशासनाच्या वतीने या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.