उपरवाला देता है तो छप्पर फाडके! बिअरचा टेम्पो भर रस्त्यात उलटला, तळीरामांची चंगळ

2876

‘उपरवाला देता है तो छप्पर फाडके’, असे आपल्याकडे बोलले जाते. याचाच प्रत्यय राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात आला. त्याचे झाले असे की बुधवारी गुहा शिवारात बिअरचा टेम्पो पलटी झाला आणि रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पडला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लॉगडाऊन काळातही वैतागलेल्या तळीरामांनी बिअर बाटल्या लांबवण्यासाठी मोठी गर्दी केली. यामुळे शौकिनाची चांगलीच चंगळ झाली.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत, मात्र 4 मे पासून झोननुसार दारूची दुकाने सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी दारू घेण्यासाठी गर्दी झाली. राज्यातील इतर शहराप्रमाणे नगर जिल्ह्यातील दारूच्या दुकान नियमानुसार सुरू झाल्या आहेत. याच दुकानासाठी माल घेऊन हा टेम्पो जात असावा अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या