
बारावी व अन्य परीक्षा या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपल्या असतानाच नगरमध्ये निवडणुकीच्या नावाखाली आता पुढाऱ्यांनी सांस्कृतिक उपक्रमाचा आनंद घ्यावा असे म्हणत सर्व शासकीय यंत्रणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कामाला लावली असून नगरमध्ये दिनांक 22 रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च यासाठी केला असून निवडणुकीच्या तोंडावर एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार आहे अशी टीका आता सर्वत्र होऊ लागलेली आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सर्व जिल्ह्यात विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचच एक भाग म्हणून 22 ते 25 फेब्रुवारी, 2024 दरम्यान येथील भिस्तबाग महल शेजारील मैदान, तपोवन रोडजवळ, नगर येथे ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विविध कला व संस्कृती जतन व संवर्धन तसेच स्वतंत्र लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती जनसमान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक महोत्सव सादर होणार असुन सकाळी 11-00 ते रात्री 10-00 या वेळेत या महोत्सवात सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.
या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी प्रदर्शनाबरोबरच विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचतगटांचे स्टॉलही लावण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून तर या ठिकाणी मोठी रेलचेल सुद्धा चालू झालेली आहे. कोट्यवधी रुपयांच्या खर्च याच्यासाठी करण्यात येणार आहे. या अगोदर अशा प्रकारच्या मोठमोठे कार्यक्रम घेऊन जनसामान्यांची एक प्रकारे चेष्टा याच सरकारने केली होती अशी चर्चा होती, त्यातच आता परीक्षेच्या तोंडावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये पुढाकार घेत महोत्सवाचे आयोजन केले. वास्तविक पाहता याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होणार नाही का असा आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. लोक त्या अर्थाने तशी विचार नाही करू लागलेले आहे, जेणेकरून मुलांच्या महत्त्वाच्या परीक्षा असताना अशा प्रकारचे विषय हाताळून काय साध्य होणार आहे.
या अगोदर शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत सुद्धा कोणत्या वधी रुपयांच्या खर्च याच नगर जिल्ह्यामध्ये झाला आहे 400 हून अधिक बसेस या शिर्डी या ठिकाणी नेण्यात आलेल्या होत्या तो सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. विशेष म्हणजे चार वेळेला हा कार्यक्रम रद्द होऊन कोट्यावधीचा खर्च हा मंडपासाठी करण्यात आला होता त्या कार्यक्रमाचे फलित काय झाले असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
आमदार लंके यांचे महानाट्य
आमदार निलेश लंके यांनी दिनांक 1 ते 4 मार्च यादरम्यान नगर येथे महानाट्य आयोजित केलेले आहे ,वास्तविक पाहता याच या अगोदर महसूलमंत्र्यांनी नगर शहरांमध्ये महोत्सव आयोजित केला व त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले आता लंके यांनी महानाट्य आणले आहे त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांची पेरणी एक प्रकारे करण्याचा घाट या महायुतीतील लोकांकडून केला जात असून नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाला माहित नाही का
एकीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रशासकीय पातळीवरची कामे वेळेत मार्गी लागावी यासाठी प्रशासकीय पातळीवर सध्या खलबते चालू आहे. अतिरिक्त कामाचा बोजा कर्मचाऱ्यांवर येऊन पडलेला आहे. त्यांना त्यांची कामे करावी लागतात त्यातच आता मार्च एन्ड जवळ आलेला आहे ,विशेष म्हणजे जर निवडणुकीची आचारसंहिता लागली तर करायचे काय असा पेच प्रशासनासमोर आहे, अशा सर्व बाबतीमध्ये आता अशा प्रकारचे महोत्सव घेणे कितपत योग्य आहे अशी चर्चा सुद्धा सुरू होती त्यामुळे प्रशासनाला या सर्व बाबींची माहिती नाही का असा सुद्धा अनेकांनी प्रश्न खाजगी मध्ये उपस्थित केला आहे.




























































