नगर शहर शिवसेनेची गरजुंसाठी मोफत अन्नछत्र मोबाईल व्हॅन

349

देशात सध्या कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय घेत जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. नगर शहर शिवसेनेच्या वतीने संचारबंदी काळात गोरगरीब आणि गरजू आहेत, विविध ठिकाणी अडकलेले आहेत अशांसाठी अन्नछत्र मोबाईल व्हॅनचे उद्घाटन अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्या प्रमाणे नागरिकांनी सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य आणखी काही दिवस घरामध्ये राहून करायचे आहे आणि या विषाणूचा कायमचा बंदोबस्त करायचा असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले आहे. यावेळी बोलताना उपनेते राठोड म्हणाले, हिंदुस्थानी नागरिक व येथील संस्कृती पारंपरिक पद्धतीने चालत आली आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा शिवसेना सर्व प्रथम धावून जाते. हे अन्नछत्र शहर व उपनगरच्या विविध भागामध्ये जाऊन गरजूंना भोजन देणार आहे. हे अन्नछत्र संचारबंदी संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, दता जाधव, परेश लोखंडे, विक्रम राठोड, मंदार मुळे, शशिकांत देशमुख, मेहुल भंडारी, लक्ष्मी नारायण मंगल कार्यलयाचे संचालक चंद्रकांत फुलारी केटरिंग असोचे राजेंद्र उदागे आदी उपस्थतीत होते.

शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, या उपक्रमासाठी आम्हाला मंगल कार्यालय असोसिएशन व केटरिंग असो यांचे सहकार्य मिळाले तसेच नगर शहरामधील व्यापारी वर्ग यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांनी आभार मानले. ज्या कोणाला मदत करायची असेल त्यांनी लक्ष्मी नारायण मंगल कार्यलय येथे संपर्क साधण्याचे आवाहन राठोड यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या