लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जनतेसाठी जिल्हा परिषद लातूर मधील पदाधिकारी, अधिकारी- कर्मचारी यांनी पाणी बॉटल व इतर जीवनावश्यक साहित्य असे जवळपास दहा ते बारा लाख किमतीचे साहित्य ट्रकमध्ये भरून हा ट्रक सांगलीकडे पूरग्रस्तांच्या मदतीला रवाना केलेला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांनी दिली.

मागील चार-पाच दिवसांपासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन या जिल्ह्यातील शहरासह अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लाखो लोकांना स्थलांतरित करावे लागलेले आहे याठिकाणी पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूंचे अत्यंत आवश्यकता आहे त्यानुषंगाने लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने पाणी बॉटल चे 625 बॉक्स(7500 लिटर), ब्लांकेट्स 500, बेडशीट 500, टी-शर्ट मोठे 1000,पॅन्ट 500, साडी 500, टी-शर्ट लहान मुलांचे 500, लहान मुलांचे 500, लेडीज लेगिन्स 250,परकर 500,अंडरवेअर पुरुष 500,महिलांसाठी निखर 500,महिलांसाठी विस्पर पॅड 2100, पार्ले बिस्कीट बॉक्स 25, तांदूळ 51कटे, दाळ 36 कटे असे एकूण अंदाजे दहा ते बारा लाख रुपये किमतीचे साहित्य सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाठविण्यात आलेले आहे.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर, इटनकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बजरंग जाधव, समाज कल्याण सभापती संजय दोरवे,बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजरत्न, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रभू जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जे. शेख यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून विविध प्रकारचे साहित्य सांगली कोल्हापूरला घेऊन जाणाऱ्या ट्रकची रवानगी केली.