मलेशियन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी मंत्र्याला अटक, जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अण्णाद्रमुकचे माजी मंत्री एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी अट केली आहे. मणिकंदन यांच्यावर एका मलेशियन महिलेवर बलात्कार करून जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्जही फेटाळला आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार मणिकंदन आणि मलेशियन महिलेची 2017 साली भेट झाली होती. ही महिला तेव्हा पर्यटन विकास संघटनेसाठी काम करत होती. बायकोला घटस्फोट देऊन आपण लग्न करू असे वचन मणिकंदन यांनी या महिलेला दिले होते. तेव्हापासून दोघे एकत्र राहत होते. मणिकंदन यांच्यामुळे मलेशियन महिला तीन वेळा गरोदर राहिली होती. मणिकंदन यांनी तीन वेळा जबरदस्तीने तिचा गर्भपात केला आणि त्यानंतरही महिलेशी संबंध ठेवले असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.


या प्रकरणी पोलिसांनी मणिकंदन यांन बंगळूरूमधून चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. मणिकंदन यांच्याविरोधात धोका देणे, ब्लॅकमेल आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेन्नई पोलील या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.