
कडाक्याच्या उन्हाळ्यात एसीशिवाय अनेकांचं पान हलत नाही. पारा इतका वाढला आहे की दिवसरात्र अनेकांच्या घरी एसी सुरू असतात. एसीची थंड हवा खात असताना घरमालकाला विजेच्या बिलाचीही चिंता सतावत असते. अशा वेळी जर या सोप्या टीप्स वापरल्या तर एसीचा थंडावा झटपट पसरतो आणि विजेचा वापर कमी करण्यासही मदत होते. गोदरेज अप्लायन्सेसच्या सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अर्णब बागची यांनी एसीच्या सुयोग्य वापरासाठी ज्या टीप्स दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.
- एसी सुरू करण्यापूर्वी पडदे लावून घ्या, त्यामुळे ऊन आणि उष्णता रोखली जाते आणि खोली लवकर थंड होते
- एसी सुरू केल्यानंतर खिडक्या किंवा दरवाजे बंद करावे
- पंचतारांकित एअर कंडिशनर निवडावा
- एसीचे तापमान 24 अंश सेल्सियसवर ठेवावे
- घराबाहेरील युनिट हे हवेशीर असावे, त्यासमोर वस्तू ठेवू नका
- स्प्लिट एसीची वर्षातून दोन वेळा सर्व्हिसिंग करून घ्यावी. एसीच्या एअर फिल्टरमधली आणि झडपांमधील धूळ साफ करणे आणि कूलंट प्रेशर तपासणे गरजेचे असते.
- सर्व्हिसिंग करणारा तंत्रज्ञ कॉईलच्या आतील भाग जेट पंपाच्या मदतीने साफ करतो आणि ड्रेनपाईपही स्वच्छ केला जातो.
- दर 6 महिन्यांनी एसीच्या बाहेरील युनिटची सफाई करणं गरजेचं आहे
- एसीची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती तज्ज्ञांकडून करून घ्या, ऑनलाइन उपाय शोधून ही कामे घरी करण्याचा प्रयत्न करू नका
- एसीचे डस्ट फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा, उन्हाळात एसी एअर फिल्टर आठवड्यातून एकदा स्वच्छ केले पाहिजे
































































