Air India Plane Crash – 10 जूनला बोहल्यावर चढला….

वडोदरा येथील भाविक माहेश्वरी याचा मृत्यू झाला. भाविक लंडनला नोकरीला होता. लग्नासाठी तो दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. गेल्या वर्षी त्याचा साखरपुडा झाला होता, तर विमान अपघाताच्या दोन दिवस आधी म्हणजे 10 जून रोजी त्याचा विवाह झाला आणि 12 जून रोजी नव्या नवरीलाचा निरोप घेऊन भाविक निघाला. वाटेत त्याच्यावर काळाचा घाला पडला. भाविकची पत्नी त्याला निरोप द्यायला विमानतळावर आली होती. पतीला हसत हसत तिने निरोप दिला. मात्र काही वेळेतच भाविक ज्या विमानात होता ते विमान क्रॅश झाल्याचे कुटुंबीयांना समजले.