
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळले असून अपघातानंतर आकाशात धुरांचे लोट उठल्याचे दिसले.
दरम्यान, बोईंग 787-8 ड्रिमलायनर हे विमान लंडनकडे जाताना कोसळले. हे विमान 11 वर्ष जुने होते. या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.
दुर्घटनेनंतर लगेचच मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. आता हे विमान कोसळल्यानंतरची पहिली दृश्य समोर आली आहेत.
India Today ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात असल्याचे वृत्त आता समोर आलेले आहे.
एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही सक्रिय झाले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यानंतर अमित शहा आणि राम मोहन नायडू हे तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
या विमानाचे संचालन कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नियंत्रणाखाली होतं. या दोघांचा एकत्रित उड्डाण अनुभव तब्बल 9,300 तासांचा असल्याची माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी दिली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाचे विमान डॉक्टर्स हॉस्टेलच्या वर कोसळले. घटनेनंतर दोन-तीन मिनिटांत पोलिस आणि इतर पथके तिथे पोहोचली. या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले. डाॅक्टर्स जेवत असताना, ही घटना घडल्यामुळे एकच हल्लकल्लोळ उडाला.
विमानात 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. विमानाच्या वैमानिकाचे नाव क्लाइव्ह होते. विमानात दोन मुलांसह 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते.
अपघातानंतर एअर इंडियाने 1800 5691 444 हा आपत्कालिन नंबर जारी केला आहे. तसेच या संपूर्ण अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहे. तर विमान वाहतूक मंत्रालयानेही 011-24610843 | 9650391859 हे नंबर जारी केले आहेत.