शोकांतिका…; तीन लेकरांसोबत पत्नीसह लंडनला निघाले… विमानात काढला शेवटचा सेल्फी…

विमान अपघातात राजस्थानच्या एका डॉक्टर दाम्पत्याचा आणि त्यांच्या तीन लेकरांचा दुःखद अंत झाला. बांसवाडा येथील जोशी कुटुंबावर काळाचा घाला पडला. डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉ. कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते, परंतु त्यांना हे माहीत नव्हते की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल. डॉ. कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्या त्यांच्या मुलांसह प्रद्युत, मिराया आणि नकुल यांच्यासह राहत होत्या, तर डॉ. कोनी यांचे पती प्रतीक जोशी लंडनमध्ये डॉक्टर होते. या काळात, डॉ. कोनी यांनाही त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट व्हायचे होते. परंतु दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. अपघातापूर्वी डॉ. प्रतीक जोशी आणि कोनी जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी काढला, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा पह्टो ठरला.

दुर्घटना पाहिल्यानंतर एमबीबीएसच्या वसतिगृहातील मुलींना रात्रभर झोप लागली नाही

एअर इंडियाचे विमान ज्या बीजे मेडिकलच्या इमारतीवर कोसळले त्या वेळी हिसारमधील बारवाला येथील रहिवासी तमन्ना मुलींच्या वसतिगृहात उपस्थित होती. तमन्ना ही बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी असून तिने संपूर्ण घटना स्वतःच्या डोळय़ांनी पाहिलीय. दुपारी वसतिगृहातून बाहेर पडताच मला मोठा स्पह्ट ऐकू आला. मुलांच्या वसतिगृहाच्या मेसवर आगीचे मोठे लोट दिसू लागले आणि क्षणात सर्वत्र काळा धूर पसरला. हा अपघात मुलींच्या वसतिगृहापासून केवळ 500 मीटर अंतरावर होता. त्यामुळे वसतिगृहातील मुलींना प्रचंड धक्का बसला आहे. या घटनेनंतर सर्वच मुली घाबरल्या. आम्ही काही मुली घटनास्थळी पोहोचल्यावर जे दृश्य दिसले ते खूप भयानक होते. मुलींच्या वसतिगृहातील एकही मुलगी रात्री उशिरापर्यंत झोपू शकली नाही, असे ती म्हणाली.

आकाशात काळेकुट्ट ढग दिसले

विमान अपघात स्थळापासून मी केवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर राहतो. दुपारी दीड-दोनच्या सुमारास विमानाचा अपघात झाला हे आमच्या मनीध्यानीसुद्धा नव्हते. आम्हाला फक्त आकाशात काळे ढग दिसू लागले. हे दृश्य पाहिल्यानंतर आम्ही एकमेकांना विचारले की, आग कुठे लागली. 15 मिनिटांनंतर कळले की एअर इंडियाचे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले आहे, असे एका प्रत्यक्षदर्शिनी सांगितले, तर आणखी प्रत्यक्षदर्शी म्हणाला, मी घरीच होतो. मला एकदम मोठा आवाज ऐकायला आला. बाहेर येऊन पाहिले तर सर्व परिसर काळय़ा धुराने वेढलेला होता.

इच्छा असूनही काही करू शकलो नाही

ज्या ठिकाणी विमान अपघात झाला तेथून माझे ऑफिस केवळ 200 मीटरवर आहे. अचानक खूप मोठा आवाज आला. मी ऑफिसमधून बाहेर आलो. संपूर्ण परिसर धुराने भरला होता. मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा मला दिसले की येथे कचरा पसरलेला होता. आग लागली होती आणि धूर येत होता. काहीही दिसत नव्हते. मग आम्हाला कळले की येथे विमानाचे पंख पडले आणि एक विमान कोसळले. अपघातस्थळी सर्वत्र आग लागली होती. लोक फक्त समोरचे दृश्य पाहू शकत होती. आग इतकी भीषण होती की लोक इच्छा असूनही काहीही करू शकत नव्हतो, अशी आपबिती एका प्रत्यक्षदर्शींने सांगितले.