
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईत दिवसभर पावसाचा जोर कायम असताना विजयवाडाहून मुंबईला येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे बोर्इंग ७३७-८०० हे विमान आज दुपारी पर्यायी धावपट्टीवर उतरताना घसरले. ब्रेक मारल्यानंतरही धावपट्टीवर साठलेल्या पाण्यामुळे ब्रेक लागले नाहीत. मात्र, वैमानिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर विमान मुख्य धावपट्टीच्या अगदी जवळ जाऊन थांबले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानातील ८९ प्रवासी सुदैवाने बचावले.
विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून विमानाचे कसलेही नुकसान झाले नसल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले. मुंबई विमानतळाची २७ नंबरची मुख्य धावपट्टी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विमाने १४ नंबरच्या धावपट्टीवर उतरत आहेत.
मुसळधार पावसामुळे वैमानिकांनी ब्रेक मारल्यानंतरही हे विमान घसरत मुख्य धावपट्टीच्या १० पुâट जवळ गेले आणि थांबले. त्यामुळे दुर्घटना टळली. यात विमान, धावपट्टी तसेच विमानतळ परिसरातील मालमत्तेचे नुकसान झाले नाही तसेच कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. विमानात ८२ प्रवासी, दोन वैमानिक, चार विमान कर्मचारी आणि एक इंजिनीअर होता. काही वेळाने वैमानिकांनी विमानासाठी उपलब्ध करून दिलेल्या पार्विंâग लॉटमध्ये विमान सुरक्षित उभे केले, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले. मुसळधार पावसामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पाईस जेटचे विमानही घरसले होते. विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरले. मात्र, साठलेल्या पाण्यामुळे ब्रेक लागले नाहीत. त्यातील १८३ प्रवासी थोडक्यात बचावले.


























































