एअर इंडियाला वेळेचे भान आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एअर इंडियाच्या मनमानी कारभाराचा फटका मुंबई ते गोवा आणि गोव्याहून मुंबई असा विमान प्रवास करणाऱया प्रवाशांना बसला आहे. वेळेचे भान नसलेल्या एअर इंडियाचे विमान तब्बल दोन तास उशिरा धावल्यामुळे विमानतळावर प्रवाशांची नाहक रखडपट्टी झाली.

गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता मुंबईहून गोव्याला जाणारे विमान पाऊण तास उशिरा तर दुसऱया दिवशी बुधवारी रात्री ११ वाजता गोव्याहून मुंबईला येणाऱया विमानाने पाऊण वाजता उड्डाण केले. विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्यामुळे शेकडो प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत बसावे लागले. यादरम्यान एअर इंडियाने प्रवाशांच्या खाण्यापिण्याचीही नीट काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे. एक सॅण्डवीच आणि ज्यूसच्या पाकिटावर प्रवाशांची बोळवण करण्यात आली.