विमानतळावरील डिस्प्ले स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडिओ, प्रवाशांची तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळावरील डिस्प्ले स्क्रीनवर पॉर्न व्हिडिओ दाखविण्यात येत असून, हा व्हिडिओ पाहून विमानतळावरील प्रवाशांची तारांबळ उडाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. हा प्रकार ब्राझील येथील सॅंटोस ड्युमॉन्ट विमानतळावर घडला आहे. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे शुक्रवारी विमानतळावरील इलेक्ट्रॉनिक ‘डिस्प्ले स्क्रीन’ हॅकर्सनी हॅक केली. या स्क्रीनवर प्रवाशांना जाहिराती आणि विमान उड्डाणाच्या माहितीऐवजी अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आले.

ब्राझीलचे विमानतळ प्राधिकरण इन्फ्राएरो यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रवाशी या स्क्रीनपासून त्यांच्या मुलांना लपवताना दिसले. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले की डिस्प्ले स्क्रीनवर माहिती पुरवण्याची जबाबदारी दुसऱ्या कंपनीवर देण्यात आली आहे. हा प्रकार विमानतळ प्राधिकरणाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हे हॅक केलेले स्क्रीन बंद केले.