विराट आणि माझ्यात कोणतीही टक्कर नाही – अजिंक्य रहाणे

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला 2-1 ने कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वच सर्वत्र कौतुक होत आहे. एडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात फक्त 36 धावांवर बाद झाला होता. या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने फक्त अडीज दिवसात हिंदुस्थानी संघावर मात करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली होती.

विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका मध्येच सोडून हिंदुस्थानात परतला होता. अशातच पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलेल्या टीम इंडियाला कर्णधार अजिंक्य रहाणे याने पुन्हा नवीन जिद्दीने उभं केलं. टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न कसोटीत जबरदस्त कमबॅक केला. अजिंक्य रहाणे याने या कसोटीत चांगली कामगिरी करत शतक ठोकलं. या कसोटीत हिंदुस्थानी संघाने कांगारूंना 8 विकेटने धूळ चारली.

रहाणेच मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर हिंदुस्थानातील आणि विदेशातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वच कौतुक केलं आहे. तसेच विराट कोहलीच्या जागी त्याला कायमचा कसोटी कर्णधार करण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. मात्र याबद्दल रहाणे याचं मत पूर्णपणे वेगळं आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला आहे की, ‘कर्णधारपदावरून माझ्यात आणि विराटमध्ये कोणतीही टक्कर नाही.’

‘आजतक’शी बोलताना रहाणे म्हणाला की, ‘कसोटीत कर्णधारपदाबाबत माझ्यात आणि विराट कोहली याच्यात कोणताही सामना नाही. टीम इंडीआयची धुरा जेव्हा विराट सांभाळतो तेव्हा आपल्या संघाला विजय मिळून देणे, हाच त्याचा हेतू असतो. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा विराट कोहलीने कर्णधार म्हणून जे केले असते. तेच मी केले.’

आपली प्रतिक्रिया द्या