अजित पवारांना मोठा धक्का! राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची धडक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले व डिझाईन बॉक्स या कंपनीचे मालक नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची टीम पोहोचली आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे समजते. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हा अजित पवारांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.