नगरमधील रॅलीला अजित पवारांची दांडी; शक्तीप्रदर्शनामुळे सर्वसामान्यांचे हाल

महायुतीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शक्तीप्रदर्शन केले. मात्र, नगर शहरांमध्ये या शक्तीप्रदर्शनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या महायुतीच्या रॅलीमध्ये कोणतेही नेते सहभागी झाले नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना रॅली काढावी लागली. तर रॅलीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली.

महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नगर शहरांत सभा घेण्यात आली. तसेच सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले आहे.यावेळी कोणीही नेते त्यांच्यासोबत नव्हते. तर फक्त पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसत होती.

महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले. मात्र, दुसरीकडे नगर शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे व प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नगर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. ग्रामीण भागामध्ये जाणारे नागरिक एसटी बस स्थानकातचे अडकले. एसटी फेऱ्या नसल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. ग्रामीण भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले. नगर शहरामध्ये वाहतुकीचे नियोजन कोलमडले होते. नगर शहरातील अनेक रस्ते बंद केल्यामुळे नागरिकांच्या हाल वाढले.