सामना प्रतिनिधी । मुंबई
नागपूर येथे ट्रक चालकाला अमानुष मारहाण करून शिवसेना युवासेनेच्या शिस्त व नियमांविरुद्ध वर्तणूक केल्याबद्दल अखिल पोहणकर यांच्यावर युवासेनेने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पोहणकर यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.




























































