
अकोला जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार दिवसभरात 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलयाने आता 124 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 13 वर कायम आहे.
दरम्यान या 13 जणांपैकी एका रुग्णाने शनिवारी पहाटे आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात 12 पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात (गेल्या 24 तासात) 9 जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत 187 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तर आणखी तिघांचे नमुने दुबार तपासणीसाठी पाठवले आहेत.त्यापैकी 137 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 126 निगेटिव्ह आहेत. तर 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून 316 जणांची नोंद झाली आहे. त्यातील 120 जण अद्याप विलगीकरणात आहेत. (78 जण गृह विलगीकरणात तर 42 जण संस्थागत विलगीकरणात) तर 138 जणांचा गृह विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, आज अखेर 103 व्यक्ती भरती असून त्यात 75 हे अलगीकरणात तर 28 हे विलगीकरणात आहेत अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथून प्राप्त झाली आहे.






























































