अकोल्यात मुलानेच केला आईचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीसोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यास आलेल्या आईच्या डोक्यात खोरे मारून मुलाने खून केल्याची घटना अकोले शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

पमाबाई किसन पवार असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विनोद किसन पवार असे अटक केलेल्याचे नाव आहे. संतोष किसन पवार यांनी फिर्याद दिली आहे.

अकोले शहरातील सुभाष रोड येथे विनोद हा दारू पिऊन पत्नी पूजासोबत भांडण करीत होता. यावेळी संतोष व आई पमाबाई भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, विनोदने अचानक खोरे उचलून आईच्या डोक्यात घातले. यात गंभीर जखमी झालेल्या पमाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तेच खोरे विनोदने संतोषच्याही डोक्यात घातले. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे तपास करीत आहेत.