‘रक्षाबंधन’च्या निमित्ताने…अक्षयकुमार भेटला राखी बनवणाऱ्या कारागिरांना

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी, रक्षाबंधनच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘रक्षाबंधन’ चित्रपट नावाप्रमाणेच भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. चार बहिणींची जबाबदारी असलेला भाऊ म्हणजेच अक्षय कुमार याचा कुटुंबाचे पालनपोषण करतानाचा संघर्ष आणि नात्यातील गोडवा चित्रपटात दाखवला आहे. 

 सध्या अक्षय चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने जयपूरमधील गोलियावास येथील राखी बनवणाऱया कारागिरांची भेट घेतली. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी तेथील महिलांनी अक्षय कुमारला राखीदेखील बांधली. ‘वर्षभर काम करून रक्षाबंधन सणासाठी राख्या बनवणाऱया आणि त्यातून उदरनिर्वाह करणाऱया कारागिरांना आम्ही भेटलो. कारागिरांना भेटून खूप आनंद झाला’, असे कॅप्शन अक्षयने दिले आहे.