‘फोर्ब्स’च्या श्रीमंत कलाकारांच्या यादीत अक्षय चौथ्या स्थानावर

627
file photo

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमारने चौथे स्थान पटकावले आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाने नुकतीच जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली. हॉलीवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अक्षयने ब्रॅडली कॉपर, विल स्मिथ, जॅकी चॅन अशा हॉलीवूड स्टार्सला मागे टाकत या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

1 जून 2018 ते 1 जून 2019 या काळात अक्षयने अंदाजे 465 कोटी कमावले. गेल्या वर्षी या यादीत अक्षय कुमार सातव्या क्रमांकावर होता. सोबत सलमान खान नवव्या क्रमांकावर होता. पण यंदा सलमानला सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 कलाकारांच्या यादीत स्थान मिळू शकले नाही.

अक्षय बॉलीवूडमध्येही सर्वाधिक कमाई करणारा आणि मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 114 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. येत्या वर्षभरात अक्षयचे सूर्यवंशी, गूड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब, बच्चन पांडे, हाऊसफुल्ल 4  असे चित्रपट येणार आहेत.

द रॉकठरला अव्वल

‘फोर्ब्स’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो ‘द रॉक’ अर्थात हॉलीवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन तर क्रिस हेम्सवर्थ दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थान मिळकलेल्या ड्वेनची एकूण कमाई ही 639 कोटी आहे. अभिनेता जॅकी चॅन पाचव्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या