दोन मिनिटे पाच सेकंदात 1.44 अब्ज डॉलर्सचा गल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बिजींग

चीनची ऑनलाईन शॉपिंग कंपनी अलिबाबाने विक्रीचा आणखी एक विक्रमी पल्ला गाठला आहे. आज वार्षिक सेलनिमित्त (सिंगल्स डे) करण्यात आलेल्या विक्रीत दोन मिनिटे पाच सेकंदात तब्बल 1.44 अब्ज डॉलर्सचा गल्ला जमवला. अलिबाबाने एकाच वेळी समूह सेल करून हा विक्रम रचला. गेल्या वर्षीचा विक्रीचा विक्रम मोडला असून 8 तास शिल्लक असतानाचा कंपनीने हा पल्ला गाठला आहे. त्यामुळे उद्या यापेक्षा मोठा पल्ला गाठला जाईल, असे सांगण्यात येत आहे. दुपारपर्यंत ग्राहकांनी 24.3 अब्ज डॉलर्सची खरेदी केली. गेल्या वर्षी दिवसभरात 25.3 अब्ज डॉलर्सची विक्री झाली होती.